. मोबीन अहमद सर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबीर
काल दिनांक २९/११/२०२२ मंगळवार रोजी जिल्हा परिषद मराठी पुर्व माध्यमिक शाळा शिरवा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. मोबीन अहमद सर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधी वाटपाचे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटचे पुढे व Electral Z Liquid वाटपाचे कार्यक्रम संतोष धुरंदर जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. मोबीन अहमद सर हे होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. यशवंत धाबे साहेब ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोताळा, मा. गजानन दीवाणे सरपंच शिरवा, मा. संदीप चव्हाण साहेब ग्रामसेवक, संतोष धुरंदर,.डॉ. अज़हर अहमद मा. वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय मलकापूर, मा.डॉ. इम्तियाज हुसैन, मा.नरवाळे सर हे होते. सदर शिबिरामध्ये आलेल्या पेशंट, लोकांची सिटी हाॅस्पिटल मोताळा येथील डॉ. अज़हर अहमद व डॉ. इम्तियाज नासिर हुसैन यांनी तपासणी व उपचार केले व गरजु लोकांना मोफत औषधी वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटचे पुढे व Electral Z Liquid वाटप करण्यात आले. यावेळी अमोल शिंबरे, आसिफ शेख, गोविंदा दीवाणे, मोईन अहमद, अरूण दीवाणे तसेच शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी व गावकरी मंडळी, पेशंट मोठ्या संख्येने उपस्थित होते..!