सैलानी महिला खून प्रकरण... रायपूर पोलिसांनी 'बाळू' ला 'घेतले ताब्यात!
बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोस्टे. अंतर्गत असलेल्या सैलानी येथे दर्शनासाठी आलेल्या लता मुरलीधर कोतकर या ५० वर्षीय महिलेचा १४ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेच्या दरम्यान निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आज १६ डिसेंबर रोजी रायपूर पोलिसांनी 'बाळू' नावाच्या संशयीताला ताब्यात घेतले असून १७ डिसेंबर रोजी रायपूर पोलिस पत्रकार घेवून प्रकरणातील सस्पेंन्स उघडणार आहेत.
सैलानी येथे राज्यभरातून अनेक भक्तगण दर्शनासाठी येतात. श्रध्देपोटी शारिरीक व्याधी असलेले महिला-पुरुष येथे मुक्कामी सुध्दा राहतात. . औरंगाबाद जिह्यातील सुलतानपूर येथील लता कोतकर या महिलेल्या मागील १० वर्षापासून पायाचा त्रास असल्याने त्या नेहमी सैलानी येथे दर्शनासाठी येत होत्या. त्या सैलानी येथे आल्या असता त्यांचा १४ डिसेंबरच्या रात्री ९ वाजच्या दरम्यान एका अज्ञात आरोपीने दगडाने ठेचून खून केल्याची घटना वनविभागाचे जंगल असलेल्या भडगाव शिवारात उघडकीस आली होती.
घटनेची माहिती मिळताच रायपूर पोस्टे. ठाणेदार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती. १५ डिसेंबरला अप्पर पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी यांनी भेट दिली होती. मृतक महिलेचा मुलगा विकास कोतकर यांच्या फिर्यादीवरुन रायपूर पोस्टे. ला भादंवीचे कलम ३०२ अन्वये अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शुक्रवार १६ डिसेंबर रोजी संशयीत म्हणून 'बाळू' ला ताब्यात आले असून पोलिस १७ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपींची संख्या जास्त आहे का, आरोपीने महिलेच्या अंगावरील दागीणे घेण्यासाठी खून केला काय, की महिलेवर अत्याचार करण्यात आला, त्यावेळी महिलेने प्रतिकार केल्याने महिलेचा निर्घृण खून करण्यात आला, हे सर्व सस्पेंन्स शनिवार १७ डिसेंबर रोजी उघडणार, एवढे मात्र निश्चीत !