Breaking News
recent

एसटी बसमध्ये छेडछाड करणाऱ्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा



 जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी बस स्थानकावर जळगाव डू वडोदा कडे जाणाऱ्या बस मध्ये खांडवी येथील सहा युवकांनी चढून मुलांसोबत मारहाण केली व मुलींसोबत छेडछाड केल्याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जा. च्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात शिकणारी व वडोदा तालुका मुक्ताईनगर येथे राहणाऱ्या विद्यार्थीनीने जळगाव ठाण्यात तक्रार दाखल केली की मागील काही दिवसापूर्वी जळगाव जामोद ते मुक्ताईनगर बस बंद झाल्यामुळे त्यांनी जळगाव डेपो मध्ये बस सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यामुळे वडोदा येथील विद्यार्थ्यांसाठी ४ वाजून ४५ मिनिटांनी बस सेवा सुरू करण्यात आली.

१५ डिसेंबरला संध्याकाळी वडोद्यासाठी बस लागली असताना त्यामध्ये खांडवी येथील मुले व मुली बसल्याने त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती म्हणून त्यांनी म्हटले की आम्हाला जाण्यासाठी ही एकच बस आहे तुम्ही खांडवीचे विद्यार्थी दुसरी बस ने या यावेळी गावातील धनेश फुसे यांनी मुलींना सांगितले की वाद घालू नका असे म्हटले होते.

परंतु १६ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांच्या सुमारास मुले व मुली, वडोदा जाण्यासाठी जळगाव येथून बस मध्ये बसले बस खांडवी येथे बस स्थानक वर थांबली असता तेव्हा आरोपी विशाल दोंगरदिवे अजय दोंगर दिने रोशन पंढरी डोंगरदिवे विकास साहेबराव डोंगरदिवे आणि दोन अनोळखी मुले एसटी बस मध्ये चढले त्यांनी धनेश सुनील फुसे यास मारहाण करायला सुरुवात केली तर विद्यार्थिनीला सुध्दा मारहाण करून छेडछाड केली.

यावेळेस खांडवी बस स्टॉप वर उभे असलेले तेजस दहिया त्यांना वाचवायला आले असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली व वडोदा जाणारी एसटी बस खांडवी वरून जाऊ देणार नाही अशी धमकी दिली ह्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध कलम ३५४ ३५४ अ , ३४३, ३२३, ५०४ सहकलम बाल लैंगिक संरक्षण कायदा ८,१३ नुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकारी हे करत आहे
Powered by Blogger.