अवैध दारू वाहतूक व हातभट्टी धंधा करणाऱ्या सहा इसमा विरुद्धराज्य उत्पादन शुल्क विभागाची कडक कार्यवाही
मलकापूर:- राज्य उत्पादन शुल्क अमरावती विभागाचे विभागीय उप-आयुक्त मा.श्री.विजय चिंचाळकर साहेब तसेच अधीक्षक मा.श्रीमती भाग्यश्री पं. जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.प्रकाश व्ही. मुंगडे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मलकापूर यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने मलकापूर कार्यक्षेत्रातील मौजे बेलाड फाटा या ठिकाणी आज दिनांक १७/१२/२०२२ रोजी दारूबंदी गुन्हाकामी छापा टाकला असता त्या मध्ये ७.७४ लि.विदेशी दारू १.४४ लि. असा एकूण ४१७०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदरील इस्मावर म.दा.कायदा १९४९ चे कलम ६५(e) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.या कार्यवाही मध्ये श्री. प्रकाश व्ही. मुंगडे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मलकापूर जवान श्री. रामेश्वर सोभागे यांनी सहभाग घेतला. नागरिकांना आव्हान करण्यात येते की सरते ३१ डिसेंबर २०२२ अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम राबविण्यात येते असुन कुठल्याही अवैध धाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारू पितांना आढळल्यास कडक कार्यवाही केली जाईल तसेच हॉटेल/ढाबा मालकावर देखील कडक कार्यवाही करण्यात येईल.