भाजपा अल्पसंख्याक बुलढाणा चे वतीने गोपाल तुपकर यांचे जंगी सत्कार
टिव्ही जर्नलिस्ट असो.च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी गोपाल तुपकर यांची सर्वानुमते निवड
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
चिखली : दिनांक १७ डिसेंबर रोजी टिव्ही जर्नलिस्ट असो. बुलढाणा जिल्ह्याची खामगाव येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी असोसिएशनची नवीन जम्बो कार्यकारणी घोषित करण्यात आली असून त्यामध्ये सीसीएन न्यूज चे संचालक गोपाल तुपकर यांची बिनविरोध बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीनंतर भाजपा बुलढाणा जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस यांच्या तर्फे त्यांचा जंगी सत्कार आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले.
टीव्ही जर्नलिस्ट असो. बुलढाणा चे नवीन जम्बो कार्यकारणी दिनांक १७ डिसेंबर रोजी चिखली येथील सीसीएन चे संचालक गोपाल तुपकर यांची बिनविरोध बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने भाजपा बुलढाणा जिल्हा अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात व पटख्यांच्या आतिषबाजी मध्ये आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेते, संघटना, पत्रकार व सर्वसमाजातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. छोट्याखाणी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे स्वरूप बघता बघता खूप मोठे झाले. टीव्ही जर्नलिस्ट असो. चे बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी गोपाल तुपकर यांची निवड झाल्याने चिखली साठी गौरवास्पद बाब असून आपल्या पदाला ते योग्य न्याय देतील असे वक्तव्य यावेळी आ. श्वेताताई महाले यांनी केले.
गोपाल तुपकर यांच्या निवडीनंतर चिखली शहरात विविध ठिकाणी त्यांचे सत्कार करण्यात आले असून या पदाला मी योग्य न्याय देऊन पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव प्रयत्नशील असणार असल्याचे यावेळी गोपाल तुपकर यांनी सांगितले