Breaking News
recent

संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन



डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत आज दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री वर आधारित कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक भगवान महावीर निवासी मूकबधिर विद्यालयाच्या वस्तीगृहामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजन भगवान महावीर निवासी मूकबधिर विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री संजय पाटील सर व डॉक्टर राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख सर यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वस्तीगृह परिसराची स्वच्छता केली आणि वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसोबत सहभोजन केले व या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला विद्यार्थी आणि स्वयंसेवकांमध्ये एकमेकांबद्दल आत्मीयता निर्माण झाली. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक अनंत भुस्कट यांनी केले, प्रास्ताविकामध्ये त्याने संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री ची माहिती उपस्थिती त्यांना दिली, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मुकेश बाभुळकर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.पूनम पडोळे व प्रा. पूजा रिंडे, प्रा. वैभव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहाय्यक सतीश धनोकार आणि धीरज इंगळे कुणाल देशमुख यासह इतर सर्व स्वयंसेवक यांनी प्रा. रितेश पोपट  यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न केले. कार्यक्रमाला भगवान महावीर निवासी मूकबधिर वस्तीगृहाचे अधीक्षक श्री डोळसे सर, व वस्तीगृहाचे इतर कर्मचारी, डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयाच्या सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Powered by Blogger.