अल्पवयीन मुलीचा विवाह, पतीसह ११ जणांवर गुन्हा;चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथील प्रकार
चाळीसगाव, जि. जळगाव अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथे घडला. याप्रकरणी पतीसह अकरा जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी हीnसध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे। वास्तव्याला आहे. १५ जून २०२१ रोजी दुपारी अल्पवयीन मुलीचा बालविवाह गोकुळ कैलास पवार यांच्याशी करून दिला. याबाबत पीडितेने पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांनी चौकशी केली. पीडित मुलीने बीड येथे या प्रकाराबाबत फिर्याद दिली होती. शुन्य क्रमांकाने चाळीसगावला वर्ग केली आहे.
मुलीनेच दिली फिर्याद
● अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. त्यावरून संशयित आरोपी तथा पती गोकुळ कैलास पवार (३०), चुलत सासरे अरुण फुलसिंग पवार (५०), चुलत दीर सजन रतन पवार (५२), सासरे कैलास फुलसिंग पवार (५४), चुलत दीर ज्ञानेश्वर बाबूलाल पवार (३५), दीर धनराज कैलास पवार (३८), चुलत दीर रवींद्र युवराज पवार (४०], (सर्व रा. लोंजे, ता. चाळीसगाव), भाऊसाहेब रामलाल सोनवणे, मुलीची आई विमलबाई सोनवणे (४५), सावत्र आजोबा अण्णा अभिमत मालिक (६८), आजी कलाबाई अण्णा मलिक (६५) (चौघे रा. मालेगाव, जि. नाशिक) यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र साळुंखे