बहापुरा ग्रामपंचायतिवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता
सरपंच पल्लवी देविदास चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्याचे केले खंडन सद्यस्थितीत झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मलकापूर तालुक्यातील बहापुरा ग्रामपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अनुसूचित जमातीच्या सौ.पल्लवी देविदास चव्हाण ह्या सरपंचपदी मताधिक्याने निवडून आल्या त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 170 अधिक मते घेऊन विजय मिळविला, सोबतच या ग्रामपंचायतीमध्ये वंचितचे एकूण सहा सदस्य निवडून येत वंचित बहुजन आघाडीने सत्ता काबीज केली आहे
परंतु या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आपले महत्त्व वाढवण्यासाठी बहापुरा सरपंच हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे अशा प्रकारची चुकीची माहिती पत्रकारांना देऊन हे वृत्त स्थानिक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केले त्या अनुषंगाने आज मलकापूर येथे पत्रकार परिषद घेत बहापुरा सरपंच सौ. पल्लवी देविदास चव्हाण यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा दाव्याचे खंडन करीत मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सरपंच असून याच पक्षासोबत एकनिष्ठ आहे व जनतेने कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, जि.संघटक भाऊराव उमाळे, तालुकाध्यक्ष सुशील मोरे, ता. उपाध्यक्ष सम्राट उमाळे, देविदास चव्हाण उपस्थित होते