केदारच्या स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
नांदुरा :- दि, 23 डिसेंबर 2022 रोजी तालुक्यातील केदार गावात जागा उपलब्ध करून स्मशानभूमी बांधून देण्यात यावी, या करिता केदार गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले, सविस्तर अशी की किशोर आत्माराम इंगळे यांची मागणी केली आहे की केदार येथे स्मशानभूमी कित्येक वर्षापासून नाही, मयत झाली की गायरान मध्ये कुठेही प्रेत जाळण्यात येते, आणि ज्या नागरिकांच्या घरी शेती असेल तो नागरिक त्यांच्या शेतामध्ये प्रेत जाळतात व ज्या नागरिकांकडे शेत जमीन नाही तो व्यक्ती गायरान मध्ये कुठेही प्रेत जळतात दुर्भाग्याची बाब अशी आहे की पावसाळ्यामध्ये मयत झाली की तीन ते चार दिवस प्रेत जाळता येत नाही, कारण असे की स्मशानभूमी बांधेल नाही.
वारंवार वार तक्रार करून तरीही स्मशानभूमी बांधून दिली नाही, आश्वासन दरवर्षीप्रमाणे देतात यावेळेस स्मशानभूमी बांधून नाही दिली तर किशोर आत्माराम इंगळे यांचे पंचायत समिती समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे असे या निवेदनात म्हटले आहे,प्रतिलिपी, मा.गुलाबराव पाटील पालकमंत्री बुलढाणा, मा.रक्षाताई खडसे खासदार रावेर लोकसभा मतदारसंघ, मा.जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब कार्यालय बुलढाणा,तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नांदुरा, ग्रामसेवक गट ग्रामपंचायत दहिवडी,यांना पाठविण्यात आले आहे, निवेदन करते किशोर इंगळे, विलास घाटे, ज्ञानेश्वर पठाडे, उदय बजारे, शाम मोरे, नितीन इंगळे, राजेश जकाते व गावातील नागरिक उपस्थित होते,