Breaking News
recent

२० वर्षीय तरुणाला लाठीकाठी व तलवारीने मारहाण केल्याची घटना

 


    मलकापूर जातीवाचक शिवीगाळ करीत २० वर्षीय तरुणाला लाठीकाठी व तलवारीने मारहाण केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मलकापूर तालुक्यातील वरखेड बस स्टैंड येथे घडली. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.   वैभव विजय वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, वैभव वानखडे व त्याच्या मित्राला तुषार सुरेंद्रसिंग राजपूत याने मारहाण केली होती. 

    याबाबत चर्चा करण्यासाठी जात असताना आरोपींनी संजय रामचंद्र वानखडे व अजय महानंदा वानखडे यांना तलवारीने मारहाण केली. तसेच वैभव विजय वानखेडे यालासुद्धा तलवारीने व काठीने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. तक्रारीवरून अतुलसिंग राजपूत, प्रवीणसिंग राजपूत, शुभम शिवपालसिंग राजपूत, पंकज राजपूत, तुषार सुरेंद्रसिंग राजपूत, बाळू राजेंद्रसिंग राजपूत, कुलदीप राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Powered by Blogger.