Breaking News
recent

समृद्धी'वर दोन मालवाहू वाहनांचा अपघात

चालक सुखरूप: गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचाही अपघात


डोणगाव समृद्धी महामार्गावर १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १५ किमीच्या अंतरामध्ये मालवाहू वाहनाचे दोन अपघात झाले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालक सुखरूप आहेत. अपघातातील एक वाहन महामार्गावरून सरळ १०० फूट खाली गेले, तर दुसरे वाहन रस्त्यालगतच उलटले. नागपूर - मुंबई असा हा महामार्ग असून, पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत तो सुरू करण्यात आला आहे. १२ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील पिंप्री माळी पुलाजवळ नागपूरहून शिर्डीकडे जाणारा मालवाहू ट्रक पलटी झाला. 

यातील चालक सुखरूप आहे. दरम्यान, याच कालावधीदरम्यान बुलढाणा जिल्ह्याची हद्द समाप्तीनंतर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भोरद शेतशिवारात रवी बाजड यांच्या शेताजवळ नागपूरकडे गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटला.अपघातानंतर हा ट्रक सरळ मुख्य मार्गावरून सुमारे ८० ते १०० फूट खोल खाली गेला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या बॅरिकेटही या अपघातादरम्यान तुटल्या, तर ट्रकनेही दोन ते तीन पलट्या घेतल्या. वेगवेगळ्या ठिकाणी हे अपघात झाले.

Powered by Blogger.