अल्पवयीन मुलींवर गँगरेप प्रकरण; आरोपी युवकांना पोलिस कोठडी !
प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध |
अकोला सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील न्यू तापडिया नगर, चिखलपुरा येथील पवननगरी चौक येथे दोन अल्पवयीन मुलींवर पाच ते सहा जणांनी शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर आळीपाळीने गँगरेप अर्थात सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना शहरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी तातडीने तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपी युवकांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर इतर फरार आरोपींचा पोलिस
शोध घेत आहेत. शहरात १४ डिसेंबर रोजी न्यू तापडिया नगर, चिखलपुरा येथील अल्पवयीन मुलगी ही दुपारी अंदाजे १ ते २ वाजेच्या दरम्यान तिच्या मैत्रिणीच्या घरून स्वतःच्या घरी परत जात असताना चिखलपुरा येथील पवननगरी चौक येथे तिला ओळखीचा मित्र राहणार चिखलपुरा हा भेटला. तो त्या मुलीला म्हणाला की, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे सांगून त्या अल्पवयीन मुलीस थोड्या अंतरावरील काटेरी झुडपात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच या प्रकाराची कोठेही वाच्यता केली तर पीडित अल्पवयीन मुलीला ठार मारून टाकण्याची धमकी दिली. त्या धमकीला घाबरून अल्पवयीन मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना कोणालाही सांगितली नाही. तर १६ डिसेंबर रोजी सदर अल्पवयीन मुलगी तिची अल्पवयीन मैत्रिणीसोबत मैत्रिणीच्या घरून तिचा वाढदिवस साजरा करून सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरी परत येत होती. त्या दोघींना चिखलपुरा येथील पवननगरी चौकात त्यांच्या ओळखीचा दुसरा मित्र भेटला व त्याने तुम्हाला घरी सोडून देतो असे सांगून दोन्ही अल्पवयीन मुलींना त्याच्या दुचाकीवर बसवून एका ठिकाणी नेऊन शीतपेय पिण्याकरिता दिले. त्या मुलींना गुंगी आल्यानंतर ओळखीचा मित्र व त्याचे इतर मित्र यांनी मिळून दोन्ही अल्पवयीन मुलींवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला असून, लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी रोहित, करण व ऋषीकेश यांना अटक केली आहे.
कोल्ड्रिंक्समधून दिले होते गुंगीचे औषध !
आरोपी युवकांनी सदर पीडित दोन अल्पवयीन मुलींना शतपेयामधून गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याने या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. आरोपी युवकांनी त्या अल्पवयीन मुलीच थोड्या अंतरावरील काटेरी झुडपात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच या प्रकाराची कोठेही वाच्यता केली तर पीडित अल्पवयीन मुलीला ठार मारून टाकण्याची धमकी दिली. त्या धमकीला घाबरून अल्पवयीन मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना कोणालाही सांगितली नाही.
घटनेची डॉ. नीलम गोन्हेंकडून गंभीर दखल
अकोल्यातील अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोन्हेंकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यांनी पोलिस महासंचालकांना कठोर कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती आहे.