Breaking News
recent

भरधाव वेगात सुनगाव जळगाव रस्त्यावर आयशर गाडी पुलावरून कोसळल्याने अपघात ; चालक जखमी

  


    जळगाव जा. सुनगाव जळगाव जामोद रस्त्यावर १८ डिसेंबर च्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान आयशर मालवाहू गाडीचा भरधाव वेगात आल्याने ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आयशर मालवाहू गाडी क्रमांक सी जी ०४ एन जे ६०४७ ही मालवाहक गाडी खाली करेंट सह पुलावरून खाली नाल्यात पडली असता यामध्ये ड्रायव्हर व कंन्डक्टर जखमी झाले त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

   सदर आयशर गाडी अम्बिकापुर छत्तीसगड येथील महेशसेठ यांची असल्याचे समजते.सदर गाडी पुलावरून खाली कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. याच पुलावरून मागील आठवड्यात सुनगांव येथील स्कार्पिओ गाडीचा सुध्दा पडून अपघ झाला होता. त्यामध्ये स्कार्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले होते. ज्या ठिकाणी हा पुल आहे त्याठिकाणी वळण रस्ता असल्यामुळे गाडी चालकाच्या लक्षात येत नाही.

     त्यामुळे याठिकाणी बरेच अपघात होतात. याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने वळण मार्ग, धोकादायक वळण याचे फलक लावावेत ही मागणी नागरिक करीत आहेत.या ठिकाणी वणळ मार्गीचे फलक न लावल्यास आणखीही अपघात होऊ शकतात. वेळीच सावध होउन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी फलक लावावेत.

Powered by Blogger.