संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला हारर्पण करून अभिवादन
आज 20 डिसेंबर 2022 संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त भाजपा महिला संघाच्या वतीने वॉटर सप्लाय नांदुरा येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी भाजपच्या महिला कार्यकर्ते हजर राहून त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. सदर महिला सातव नगर प्र. क्र. 8 मधील होत्या
याप्रसंगी अनिताताई ब्रह्मानंद चौधरी भाजपा जिल्हा सचिव मंदा संतोष कोडी ,सिंधुबाई सपकाळ, शालुबाई दामोदर ,सरिता ताई तांदूळकर, लताताई हिरळकार या महिला उपस्थित होत्या यानिमित्त प्रत्येकाने गाडगेबाबांचे कार्य व त्यांचे कर्म सर्वांसमोर मांडले अशा पद्धतीने कार्यक्रम झाला संत गाडगे महाराज की जय घोषणांनी आसमंत दुमदुमले.