Breaking News
recent

श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 


अंधश्रद्धा निर्मूलन तसेच स्वच्छता अभियान याचा अविरतपणे वसा घेणारे व आपल्या लोकप्रबोधनातून जनजागृती करणारे श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्याने वऱ्हाड प्रांतातील त्रिमूर्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री संत गाडगे महाराज व शिक्षण व कृषी महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या समर्पित बहुजन हिताय बहुजन सुखाय कार्याचा जागर घराघरात पोहोचवण्यासाठी* वऱ्हाड प्रांत कृषक सेवा संघा चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रमाकांत जी महाले यांच्या नेतृत्वाखाली तसेच सत्याग्रही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री कैलास भाऊ फाटे यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक २०.१२.२२ श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी पासून  २७.१२.२२ डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जयंती पर्यंत विविध ठिकाणी लोकप्रबोधन जनजागृती यात्रा काढून, त्या त्रिमूर्तींच्या कार्याला उजाळा  म्हणून वऱ्हाड प्रांत कृषक सेवा संघ शेतकऱ्यांच्या भूमिपुत्र शेतमजूर छोटे व्यावसायिक नोकरदारांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन नवराष्ट्र निर्मितीमध्ये त्यांचे योगदान व्हावे व त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातही सुवर्ण सकाळ यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मिशन समृद्धीचे अंतर्गत कार्यारंभ  जिल्हा सामान्य रुग्णालय खामगाव येथे सामान्य जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर टापरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉक्टर खंडारे साहेब फार्मासिस्ट श्री जाधव साहेब यांच्या पुढाकाराने आज  दिनांक२०.१२.२२ ला श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त फळ वाटप तसेच लोकप्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देश वऱ्हाड प्रांत कृषक समाज सेवा संघाचे संस्थापक सदस्य विजय डवंगे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री रमाकांतजी महाले त्या प्रमुख उपस्थिती मध्ये कैलास भाऊ फाटे ,निखिल सरप,चंद्रकांत जी महाले, श्री सातपुतळे व इतर समाज बांधव उपस्थित होते...

Powered by Blogger.