प्रवीण भारंबे यांच्या बदलीसाठी विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले निवेदन
नांदुरा :- उपविभागीय मलकापूर यांच्या कार्यालयात मागील अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी राहून तलाठी स्थापना सांभाळणाऱ्या प्रवीण भारंबे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या तलाठी लोकांनी शेवटी संघटनेच्या माध्यमातून भारंबे यांची बदली करण्यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले आहे, मागील दहा वर्षापासून एकाच ठिकाणी तलाठी स्थापना पाहणाऱ्या भारंबे यांची प्रशासकीय बदली झाली असताना सुद्धा आपल्या राजकीय आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जवळीक असल्याने त्याचा फायदा घेत बदलून न जाता त्याच स्थापना चा कारभार आपल्याकडे ठेवला आहे, यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज लावला जाऊ शकतो, त्यामुळेच काही तलाठी मंडळींना त्यांचा त्रास सुद्धा झाला असेलच त्यामुळेच विदर्भ पटवारी संघटना नागपूर - 2 तालुका शाखा नांदुरा यांनी दिनांक 11/ 11/ 2022 रोजी यांच्या कारभाराला कंटाळून शेवटी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले आहे, या निवेदन नंतर भारंबे यांची बदली होती की ते काय आपली ताकद पणाला लावून बदली रद्द करून असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,