Breaking News
recent

शेतकऱ्यांचे बंद केलेले राशन पुन्हा सुरू करा. नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी



नांदुरा प्रतिनिधी :- शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.तो पिकवतो अन् साऱ्या जगाला पुरवतो. पण पिकाला हमीभाव न मिळाल्यामुळे व कायम निसर्गाच्या असंतुलीतपणामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात असतो व दारिद्र्य सारखं जीवन जगतो, याला कोणाला एकाला जबाबदार धरता येणार नाही.पण शेतकऱ्याची ही परिस्थिती बदलायला हवी हे सरकार मायबाप म्हणून तुमच्याकडे आम्हा शेतकऱ्यांचं मागणं आहे.शिवाय शासनाकडून जो शिधा वाटप करण्यात येतो तो ही आता शेतकऱ्यांना मिळणे बंद  झाला असल्याने शेतकरी आणखी विवंचनेत पडला आहे.तरी शेतकऱ्याला पूर्ववत स्वतः धान्य मिळावं करिता निवेदनाच्या माध्यमातून नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Powered by Blogger.