शिक्षण विभागाच्या मनमानीला कंटाळुन अखेर अडगाव बु! येथे शाळा बंद आंदोलन
अडगाव प्रतीनीधी
अडगाव बु! जिल्हा परिषद येथे इयत्ता ९वि व १० वि ला विज्ञान विषय शिकविण्यासाठी मागील १३ वर्षापासुन शिक्षक नाही गणित विषय शिकवणारे शिक्षक सन २०२० सेवानिवृत्त झाल्यानंतर गणित विषयाचे पद रिक्त आहे.तसेच इयत्ता ९ वि तसेत इयत्ता १०वी करिता फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे.हीच परिस्थिती मागील २ वर्षापासुन इयत्ता ११वी तसेच इयत्ता १२ वी करिता फत्त एक शिक्षक कार्यरत आहे हीच परिस्थिती मागील २ वर्षापासुन इयत्ता ११वी तसेच इयत्ता १२वी ची आहे.या वर्गाकरिता मराठी व इतीहास विषय शिकवण्याकरिता शिक्षक उपलब्द नाही. शाळा व्यवस्थापन समीतीने या आधी अनेकदा मा.शिक्षणाधिकारी प्राथ जि.प.अकोला यांची भेट घेऊन शिक्षकाची मागणी केली तसेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. शिक्षणाधिकारी प्राथ यांना निवेदन सादर केली प्रत्येक वेळी ४दिवसात शिक्षक देवु असे आस्वासन देण्यात आले.परंतु सञ सुरु होवुन ६महीण्याचा कालावधी उलटुन ही शिक्षकांच्या नियुक्ती केल्या नाही यावरुण प्रशासनिक अधिकार्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळच करायचा आहे असे दिसुन येत आहे.
अखेर प्रशासनाच्या या मनमानीला कंटाळुन शाळा व्यवस्थापन समीती व पालकांनी मा. शिक्षणाधिकारी प्राथ .यांच्या कार्यालयात भविष्यात शाळा बंद आदोलन पुकारण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे लेखी स्वरुपात सुचित करुनही या कार्यालयाकडुन शिक्षक नियुक्त करण्यासाठी कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असे दिसुन आले नाही.अखेर दि.१५डिसेंबर २०२२ला शाळा व्यवस्थापन समीती च्या सभेत पालकांचा लिखीत पाठींब्यासह दि./१२/२०२२रोज सोमवार पासुन शाळा बंद आदोलन करण्याचे निच्श्रित करण्यात आल्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. उपरोक्त विषयान्वये जि.प.शाळा विद्यालय अडगाव बु! येथे पूर्ण वेळ शिक्षकांची नियुक्ती होईपर्यन्त शाळा बंद आदोलन करण्यात येत आहे.