ब्लू बेल्सची विद्यार्थ्यांनी मुनजा शेख पोस्टर स्पर्धेत सर्व द्वितीय
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
दि.१६ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या नायगाव येथील सोळाव्या वकृत्व स्पर्धेत ब्लू बेल्स शाळेची विद्यार्थिनी मुनजा शेख हिने पोस्टर स्पर्धेत उत्कृष्ट गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे यामुळे मुनजा हिचे सर्व स्तरातून स्वागत होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
ब्लू बेल्स शाळेची इयत्ता नववी ची विद्यार्थिनी मुनजा अ.वाहेद या विद्यार्थ्यांनीने पोस्टर स्पर्धेत उत्कृष्ट व सुंदर असे 'हम सब एक है' असे दाखवून एकतेचा संदेश दिला या पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार नांदेड व युवा नेते प्रा.रविंद्र पा.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांनी सदर पोस्टर चे तोंडभरून कौतुक केले असून मुनजा हिने द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के हरीबाबू,डॉ.के.हरिबाबू,मुख्याध्यापिका सितामहालक्ष्मी कोपेलू,पर्यवेक्षिका साईदिप्ती हरिबाबु कोपेलू, जावेद सर,दत्ता कंदुरके सर,गंगाधर कानगुले सर,शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या