Breaking News
recent

मलकापूर शहरात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू

 ४११ जणांनी कागदपत्र न दिल्याने यादी रखडली : सर्वेक्षणात साहाय्य करण्याची गरज


    मलकापूर शहरात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. शहरातील ७६० फेरीवाल्यांची ऑनलाइन जिओ टगिंग सर्वेक्षण करून नोंदणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप ४११ फेरीवाल्यांनी आवश्यक कागदपत्र जमा न केल्यामुळे फेरीवाला यादी रखडली आहे.मलकापूर शहरात शहर फेरीवाला धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार शहरातील फेरीवाले यांचे सर्वेक्षण करून त्यांचे आवश्यक कागदपत्र जमा करून नोंदणी केलेली आहे. त्यानंतर फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार करण्यात येत आहे. त्यानुसार मलकापूर शहरातील एकूण ७६० फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. ७६० फेरीवाल्यांची ऑनलाइन जिओ टगिंग सर्वेक्षण करून नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यातील ३४९ फेरीवाल्यांनी कागदपत्र जमा केलेले आहे. 

    त्यांचे कागदपत्र पोर्टलला अपलोड करण्यात आलेले आहे. अद्याप ४११ फेरीवाल्यांनी आवश्यक कागदपत्र जमा न केल्यामुळे मलकापूर शहर फेरीवाला यादी तयार करता येत नाही आहे. त्यामुळे २० डिसेंबरपर्यंत ४११ फेरीवाल्यांनी त्यांचे कागदपत्र प्रकल्प विभाग, मलकापूर नगरपरिषद येथे जमा करण्यात यावे. तरच त्यांचे मुख्याधिकारी, नगरपरिषद, मलकापूर नाव अंतिम यादीमध्ये घेण्यात येणार आहे. अंतिम यादी तयार झाल्यानंतर कागदपत्र घेण्यात येणार नाही याची नोंद उर्वरित ४११ फेरीवाल्यांनी घेण्यात यावी, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. फेरीवाल्यांनी आहे. यानंतर अंतिम यादी तयार करण्यात येईल. ४१९ फेरीवाल्यांचे कागदपत्र मलकापुर नगरपरिषदमध्ये  देणे बाकी आहे. त्या फेरीवाल्यांची यादी प्रकल्प विभाग नगरपरिषद मलकापूर येथे लावण्यात आलेली कागदपत्र लवकरात लवकर नगरपालिकेत जमा करावी, असे आवाहन मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले आहे.


    आधारकार्ड, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, अपंग दाखला, घटस्फोटित किंवा विधवांची कागदपत्र गोळा करण्यात यावी. आधारकार्ड व रेशनकार्ड आवश्यक आहे. ४१९ फेरीवाल्यांनी लवकरात लवकर कागदपत्र प्रकल्प विभाग नगरपरिषद येथे जमा करायला हवे. -रमेश ढगे.मुख्याधिकारी नगरपरिषद मलकापूर

Powered by Blogger.