गीता जयंती निमित्त विश्व हिंदु परिषद बजरंग दल, माहिलाशक्ती, दुर्गा वाहिनी - मलकापूर द्वारे विशाल शौर्य यात्रेचे आयोजन
मलकापुर- 12-12-2022 रोजी हुतात्मा संजय सिंह राजपूत यांच्या स्मारक मलकापुर येथे शौर्य यात्रेचे आयोजन करन्यात आले ही यात्रा मलकापुर शहरात हुतात्मा संजय सिंह राजपूत यांच्या स्मारक येथून जय श्री राम वन्दे मातरम च्या जयकाराने प्रारंभ होऊन, माता महाकाली नगर, गांधी नगर, चांडक शाळा येथून, कोडवाडा रोड,स्टेशन रोड, तहसील चौक, बुलढाणा रोड येथून हुतात्मा संजय सिंह राजपूत यांच्या स्मारक येथे जाहिर सभा द्वारे समारोप करण्यात आले. यात्रा मध्ये राम मंदिर, राम दरबार सह भगवत गीता ग्रंथ देखावा ट्रैक्टर वर साकार केला होता. सभेचा प्रारम्भ प्रभु श्री राम व भगवत गीता यांच्या माल्या अर्पण व दीप प्रज्वलन पूजन द्वारे झाले.
सभे करीता प्रमुख वक्ते म्हणुन श्री . देवेशजी मिश्राविदर्भ प्रांत सहमंत्री, विश्व हिंदु परिषद तर प्रमुख अतिथी राम भारती महाराज प्रमुख उपस्थिति एडवोकेट अमोलजी अंधारे बजरंगदल विदर्भ प्रांत संयोजक, श्री.राजेशजी झापर्डे विश्व हिन्दू परिषद जिल्हा अध्यक्ष खामगाव, जिल्हा मंत्री राजेशसिंह राजपूत, मातृशक्ति विभाग संयोजीका कोरडे ताई हे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ पाटिल सर माजी शिक्षक, ज्येष्ठ कारसेवक हे होते.
प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री देवेश मिश्रा यांनी व्यासपीठावरून बोलताना सांगितले की देशात लव जिहाद, धर्म परिवर्तन यांचे प्रणाम दिवसेन दिवस वाढत चलले आहे है खांबवन्या करीता गौवंश रक्षणा करीता बजरंगदल कार्यकर्ता स्वताच्या जीवाची काळजी नकरीता कार्य करत आहेत देशातील प्रत्येक युवाने बजरंगदल मध्ये देव,देश,धर्म कार्यकरण्या करीता बजरंगदल मध्ये सहभाग घ्यावा असे आव्हान उपस्थित युवा वर्ग यांना केले .
विश्व हिंदू परिषदेचे मूळ स्वरूप सेवा आहे. 1964 मध्ये स्थापनेनंतर आपल्या धर्मबंधु,नैसर्गिक प्रेम आणि आत्मीयतेच्या जोरावर विविध प्रकारच्या सेवा कार्यांचा हळूहळू विकास करण्यात आला.
“जगाचा संबंध म्हणजे ‘रणनुबंध’. या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे सर्वांची सेवा करणे आपन राष्ट्र,धर्म,हित कर्ता कार्य केले पाहिजे."मानवी जीवन स्वतःच्या उपभोगासाठी नाही तर ते समाज बांधव,माता भगिनी , धर्म, राष्ट्र हिताची रक्षाना करण्यासाठी आहे.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक एडवोकेट अमोल अंधारे यांनी व्यासपीठावरून बोलताना सांगितले की 6 डिसेम्बर ला प्रभु श्री राम जन्मभूी अयोध्या येथे विवादित बाबरी मस्जिद ढाचा यांच दिवशी सर्व कारसेवक यांनी पाडला होता त्या दिवसी तीथी होती गीता जयंती आणि त्या कार सेवक यांच्या शौर्य व बलिदान मुळे आज अयोध्या येथे राष्ट्र मंदिर निर्माण होत आहे आणि जे लोक बोलत होते कसम राम की खाते है मंदिर वही बनायेगे पर तारीख नही बतायेगे त्या लोकांना आज उत्तर ही मिळाले आहे आज भव्य असे रामलला यांचे मंदिर अयोध्या मध्ये बनत आहे ज्याचे लोकआर्पण 2024 मध्ये आहे. असे एडवोकेट अमोल अंधारे बोलत होते.
कार्यक्रर्मचे अध्यक्ष कारसेवक हरीभाऊ पाटिल सर हे होते यांनी 1992 मधील घडलेला चितथरारक अनुभव उपस्थित जनसमुदाय यांना केले त्या नंतर उपस्थित कारसेवक यांचे सत्कार मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना विहिप जिल्हामंत्री राजेंद्रसिंह राजपूत, सूत्रसंचलन विहिप मलकापुर नगर उपाध्यक्ष विशाल दवे केले.सर्व उपस्थित कार सेवक, नगर पालिका, पोलिस प्रशासन या कार्यक्रमा करीता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहयोग करणाऱ्या सर्व लोकांचे आभार विहिप नगर अध्यक्ष दिलीप पाटिल यांनी मानले.