Breaking News
recent

डी.बी. पथकाला गांजा पकडण्यात यश ; सुरत येथील दोन संशयित अटक

 


   मलकापूर: बुलढाणा जिल्ह्यात पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अधिकारी यांना आप – आपले पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पायी पेट्रोलिंग राबवुन गैर कायद्याच्या गतीविधींना आळा घालुन त्याचे समुळ उच्चाटन सुचना दिल्याने मलकापुर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो . नि . विजयसिंह राजपुत यांनी शहर पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पायी पेट्रोलिंग मोहीम सुरु केलेली आहे . दि. 06/12/2022 रोजी 19. वाजेचे सुमारास पोलीस निरीक्षक राजपुत आणि डी.बी. पथकाचे स.पो.नि. सुखदेव भोरकडे व डी.बी.स्टाप पायी पेट्रोलिंग करीत असतांना पोनि विजयसिंग राजपुत यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , दोन इसम त्याचे ताब्यातील भुरकट रंगाच्या पाठीवरील बॅग मध्ये मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणारा गांजा अमली पदार्थ बाळगुन भारतकाटा कडुन तहसील चौकाकडे पायी घेवुन जाणार असल्याची बातमी मिळाली असुन सदर बातमीची पडताळणी करुन सदर इसमावर कायदेशिर कारवाईची तयारी करुन छापा कारवाई करा बाबत पोनि राजपुत यांनी स.पो.नि. भोरकडे व डी.बी. स्टाप अशांना आदेशित केले होते .

  दरम्याण कारवाईची संपुर्ण तयारी करुन राञी 23.00 वाजेचे सुमारास नायब तहसिलदार आणि शासकीय पंचासह सापळा रचुन बसलेलो असतांना शिवाजी नगर ते तहसील चौक दरम्याण असलेल्या पंचायत समीती समोरील रोडावर दोन संशयीत ईसम बॅगसह पायी चालत असतांना दिसुन आल्याने त्यांना पंचासमक्ष पो स्टापच्या मदतीने थांबविले असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यां दोघांनाही जागीच पकडुन त्यांचे नाव गाव विचारले असता , त्यांनी त्याचे नाव 1 ) शाह सादीक मेहबुब , वय 30 वर्ष , रा . संजयनगर , एस . एम . सी . शाळे जवळ , उमरवाडा , नया कामेला , चौरासी , सुरत , 2 ) शेख कादर शेक रहीम भाई , वय -28 वर्ष , रा . संजय नगर , झोपडपट्टी , सिल्वर डाईन नया कमेला , उमरवाडा , सुरत असे सांगितले वरुन त्यांच्याकडील पाठीवरील बॅग मध्ये 7 किलो 430 ग्रॅम वजनाचा 89,160 रुपये कि . चा गांजा राजपत्रीत अधिकारी व पंचा समक्ष जप्त केला आहे . व दोन्ही आरोपीतांविरुध्द स.पो.नि. सुखदेव भोरकडे यांनी दिलेल्या फिर्यादवरुन गु.र.नं. 524/2022 , एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 ( क ) , 20 ( ब ) ( ii ) ( ब ) अन्वये गुन्हा दाखल करुन पो.नि. राजपुत यांनी स्वतः तपास घेतला आहे . 

  दरम्याण दोन्ही आरोपीतांना मा.न्यायालयाने दि. 09/12/2022 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे . सदरची कार्यवाही सारंग आवाड पोलीस अधिक्षक बुलढाणा , अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक खामगांव , अभिनव त्यागी उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पो.स्टे . प्रभारी अधिकारी विजयसिंह राजपुत व सपोनि सुखदेव भोरकडे तसेच पो.हे.कॉ. भगवान मुंढे , पोका गोपाल तारुळकर , पोका ईश्वर वाघ , पोका असिफ शेख , पोका सलीम बरडे , पोका प्रमोद राठोड , पो.का. संतोष कुमावत यांनी केली आहे .

Powered by Blogger.