संग्रामपुर तालुक्यातील लेंडी नदीतून रेतीची अवैध वाहतूक सुरुच, महसूल विभागाचे दुर्लक्ष
मतीन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर :
संग्रामपुर तालुक्यातिल मागील काही दिवसांपासून उमरा गावाजवळील नदी नाल्यांना रेती तस्करांची काळी नजर लागली आहे. सुर्योदयापूर्वी तर सुर्यास्तानंतर नदी नाल्यामधून रेती चा उपसा सुरु आहे. या नदी- नाल्यातून सर्रास रेतीचे उत्खनन करून त्याची ट्रॅक्टर द्वारे अवैधरित्या वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे नदी -नाल्यात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. दिवसाकाठी हजारों ब्रास रेतीची तस्करी करण्यात येत आहे.
त्यामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसत आहे. दिवसाढवळया रेतीची वाहतूक होत असताना देखील अद्याप महसूल प्रशासनाने बावनबिर, उमरा या गावातिल वाळूमाफियांच्या एकाही वाहनावर कारवाई केली नाही. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका उपस्थित केल्या जात आहे.
आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या संग्रामपूर तालुक्यात वाण, पांडव, केदार, लेंडी सातलोन या नद्यांसह अनेक रेती उत्पादित नाले आहेत. या नाल्यांमध्ये रात्रदिवस अवैध वाहतुक सुरु आहे. महसुल विभागाचे लक्ष देण्याची गरज आहे.