शेतकरी पती-पत्नीची कर्जबाजारीला कंटाळून नांदुरा तालुक्यातील बेलूरा येथील घटना
मोताळा सततची नापिकी कर्जबाजारीपणाला व कंटाळून पती-पत्नी दोघांनीही विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची हृदविदारक घटना बेलूरा ता. नांदुरा येथे आज २९ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजेपूर्वी घडली.
प्राप्त माहितीनुसार बेलूरा ता. नांदुरा येथील सौ. सरलाबाई वसंत डामरे (वय ६५) व वसंत जगदेव डामरे (वय ७०) हे कुटूंब राहत होते. त्यांचेजवळ दोन एकर शेती असून हे कुटूंब त्यांचे अत्यल्प शेतीवर कुटुंबाचा गाढा ओढत होते. त्यांना ३ मुले असून दोन मुली कुटूंबासह अकोला राहतात, एक मुलगा कुटुंबासह आई - वडिलासोबत बेलूरा येथे राहतो. सौ. सरलाबाई ह्या आजारी असल्यामुळे त्यांचे दवाखान्याला सुध्दा बराच खर्च झाला होता.
कुटुंबात ५ ते ७ व्यक्ती व अत्यंत कमी उत्पन्न त्यामध्ये वृध्दत्व व आजारीपणामुळे या कुटुंबाकडे शेतीवर महाराष्ट्र बँक शाखा येथील कर्ज होते व इतर सुध्दा बाहेरचे खाजगी कर्ज होते. या विवंचनेतच त्या दोघांनीही २८ डिसेंबरच्या रात्री सोबतच मोनोसील नावाचे विषारी औषध घेवून जीवनयात्रा संपविली. या घटनेची फिर्यादी लक्ष्मण देवराज डामरे (वय ४८) रा. बेलुरा यांनी बोराखेडी पोस्टे. ला दिली. तपास अमोल खरोटे करीत असून या दोघांनी सततची
कर्जबाजारीपणामुळे नापीकी व कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी व सरपचं विनोद मेहेंगे यांनी दिली. दोघांनी सुध्दा सोबत विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत बोराखेडी पोस्टे. ला मर्ग दाखल करण्यात आला आहे.