काटी येथे श्री संत वियोगी महाराज जन्मोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
नांदुरा/प्रतिनीधी
तालुक्यातील ग्राम काटी येथील हनुमान मंदीर मध्ये श्री संत वियोगी महाराज जन्मोत्सव तथा श्रीमद् भगवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह नुकताच पार पडला. या सप्ताचे आयोजन दरवर्षी ग्रामस्याच्या वतीने करण्यात येते.भागवत सप्ताहाला ३८ वर्ष पूर्ण झाले.
ह.भ.प. श्री सुरेश महाराज, सस्ती वाडेगांव यांच्या वाणीतून भक्तांनी भागवत कथेचे श्रवण केले. सप्ताह काळात गावांमध्ये भक्ती मय वातावरण तयार झाले होते. पौष कृ.२ सोमवार ९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १२ दिंडी सोहळा दुपारी १२ ते १ किर्तन व २ ते ५ महाप्रसाद चे वितरण करण्यात आले.दिंडी सोहळा वेळी गावा मध्ये साफसफाई रांगोळी, दिव्याची आरास केली होती. दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण लहान मुलीनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कळस घेऊन मुली दिंडीत सोहळ्यात सहभागी झाल्या तर लहान टाळकरी मुले यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर पाऊल्याचा ठेका धरला होता त्यामुळे मुख्य आकर्षण ठरले होते. ह.भ.प. श्री रविंद्र महाराज हरणे मुक्ताईनगर यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.हनुमान मंदिर च्या वतीने पंचक्रोशीतील दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भाविकांना वियोगी महाराज प्रतीमा श्री फळ शेला टोपी देऊन सत्कार करण्यात येतो.या सप्ताहा मध्ये दरवर्षी पंचक्रोशीतील टाळकरी व भावीक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.