वरखेड येथे बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्या जातीयवादी आरोपींना तात्काळ अटक करा--वंचित बहुजन आघाडीचा मलकापूर मध्ये "हल्लाबोल मोर्चा"
वरखेड ता. मलकापूर येथे दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी जातीयवादी मानसिकतेतून तेथील सवर्ण जातीच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात जमाव जमवून मागासवर्गीय बौद्ध लोकांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवारी व लाठ्याकाठ्यांनी हल्ला करणारे व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झालेले तथा १ महिन्यापासून फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर येथे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांचे प्रमुख मार्गदर्शनात "हल्लाबोल मोर्चा" काढण्यात आला
या मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष सुशील मोरे जी. उपाध्यक्ष यशवंत कळासे, जी.संघटक भाऊराव उमाळे, भा.बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष एस.एस.वले सर, तालुकाध्यक्ष राजु शेगोकार, तालुका नेत्या दीपमाला इंगळे, शहर अध्यक्षा अलमनुरबी यांनी केले
या हल्लाबोल मोर्चाची सुरुवात रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली व शेकडो महिला पुरुषांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देत त्यांचे मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले सोबतच हा मोर्चा डीवायएसपी कार्यालयावर सुद्धा जाऊन धडकला, याप्रसंगी मोर्चेकरांनी प्रचंड घोषणाबाजी करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली
याप्रकरणी या जातीवादी आरोपीवरती मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक २९५/२०२३ नुसार अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३(१)(r), ३(२)(s), ३(२)(va), ३(२)(पाच), व भारतीय दंड संहिता ३०७,३२४,१४३,१४४,१४७,१४८,१४९,५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे
परंतु आरोपीवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असल्यावर सुद्धा त्या आरोपींना तब्बल एक महिना उलटून गेल्यावर सुद्धा अद्यापही अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे सदर आरोपींना स्थानिक पोलीस प्रशासन सहकार्य करून पाठीशी तर घालीत नाही ना....? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही आणि या सर्व पार्श्वभूमीमुळे हा मागासवर्गीय लोकांवर एक प्रकारचा अन्याय होत आहे
या उलट या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व इतर लोकांवर विविध प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
जातीवादी आरोपींची प्रवृत्ती ही गुन्हेगारी स्वरूपाची असून यांच्यावर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत व या आरोपीपासून तेथील मागासवर्गीय जनतेला व त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे तरी या..
१) फरार असलेल्या जातीयवादी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी
२) संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या आरोपीवर मोक्का कायदा कायद्याअंतर्गतत कारवाई करावी
३) या आरोपी वरती विविध प्रकारचे गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यांच्यावर त्वरित तडीपारचि कारवाई करण्यात यावी
४) या प्रकरणांमध्ये अत्याचार ग्रस्त लोकांवर झालेले खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे
व या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासन व पोलीस प्रशासनाची राहील हा इशारा यावेळी देण्यात आला