Breaking News
recent

राष्ट्रीय युवक दिन व जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम.


        मलकापूर दि.१२ जानेवारी  येथील मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचलित गोविंद विष्णू महाजन विद्यालयात स्वामी विवेकानंद अर्थात राष्ट्रीय युवक दिन व जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षीका दिक्षित तर प्रमुख अतिथी म्हणून विरपत्नी श्रीमती सुषमादेवी राजपूत तथा मुख्याध्यापक एम.पी.कुयटे उपस्थित होते. 

    यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई, जिजाऊ, रमाबाई आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, बाल शिवबा, स्वामी विवेकानंद, विर तानाजी मालुसरे आदी महान व्यक्तीमत्वांच्या भुमीका साकारुन प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. कार्यक्रमा दरम्यान जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे प्रदर्शन व बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. 

    कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ नितीन भुजबळ यांनी तर नियोजन कला शिक्षिका कविता जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यी, शिक्षक -शिक्षिका व कर्मचारी यांचे योगदान राहीले.

Powered by Blogger.