Breaking News
recent

अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी

 

बोराखेडी पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा


      मोताळा : एका अल्पवयीन मुलीच्या सोबतचे फोटो वाईट उद्देशाने व्हायरल करून तिची बदनामी केल्याची घटना ९ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीने पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली. दिलेल्या फिर्यादीवरून पलढग येथील मंगेश पायगहान या युवकाने अल्पवयीन मुलीसोबत दोन वर्षांपूर्वी मोबाइलमध्ये फोटो काढले हे काढलेल्या फोटो मंगेशने 1 जानेवारीला वाईट उद्देशाने साक्षीदार यांच्या मोबाइलवर व्हायरल करून बदनामी केली आहे. 

    फिर्यादीचे फोटो  व्हायरल झाल्याने तिच्या लग्नात अडचणी निर्माण होत आहे तसेच फिर्यादीच्या आईला तुम्ही मुलगी मल  नाही दिली तर तिचे फोटो व्हायरल करून तिचे लग्न दुसरीकडे होऊ देणार नाही अशी धमकी दिली असल्याच अल्पवयीन मुलीने बोराखेडी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यावरून बोराखेडी पोलिसांनी मंगेश पायगहान याच्या विरोधात गुन्ह दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक भगवान पारधी करीत आहेत

Powered by Blogger.