Breaking News
recent

मलकापूर ठाणेदार विजयसिंग राजपूत यांची लोणार ठाणेदारपदी बदली तर मलकापूर ठाणेदार म्हणून अशोक रत्नपारखी येणार

 

         मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांची लोणार पोलीस स्टेशन ठाणेदार पदी बदली करण्यात आली असून मलकापूर शहर पोलीस स्टेशन ठाणेदारपदी नियंत्रण कक्ष बुलडाणाचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांनी १० जानेवारी रोजी प्राप्त अधिकारा नुसार जिल्हा पोलीस दल आस्थापना मंडळाच्या बैठकीमध्ये मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजयसिंग राजपूत यांची लोणार ठाणेदार पदी बदल केली असून त्यांच्या जागेवर नियंत्रण कक्ष बुलडाणाचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांची नियुक्ती केली आहे.

    सदरचे बदलीचे आदेश पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांनी काढले असून आदेशात नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचेकडील सर्व प्रलंबीत गुन्हे, तपासाची कागदपत्रे, केस डायरी, अर्ज चौकशी व इतर प्रलंबित प्रकरणे पोस्टे / शाखा मधील अन्य अधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करून बदली पदस्थापना झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर होवून अहवाल कार्यालयास सादर करण्याचे नमूद केले आहे.

Powered by Blogger.