जिल्हयातील महिला खेळाडूंना उज्वल भविष्य- निखील भोसले
मलकापूर प्रतिनिधी
येथे संपन्न झालेल्या महिलांच्या टी 20 क्रिकेट स्पर्धेत बुलडाणा 11 संघाने अमरावती एससीए संथावर तीन सामन्याच्या मालिकेत 3-0 ने मात केली .पहिल्या सामन्यात बुलडाणा संघाने 19 धावांनी,दुस-या सामन्यात 10 विकेटने तर तिसरा सामना 80 धावांनी जिंकत मालीका 3 शून्यने जिंकली.बुलडाणा 11 संघाकडून कर्णधार मानसी पांडेने दोन अर्धशतकासह 172 धावा व 4 बळी घेत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले तिला आचल साहूने 72 धावा,तर सुप्रिया पाटीलने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत आपल्या खेळाचा ठसा उमटविला.तसेच संपूर्ण स्पर्धेत राईया पठाणने उत्क्रुष्ठ यष्टीरक्षणचे काम केले तर अमरावती संघाकडून कर्णधार प्राची पुरी व आर्ची सरयाम हिने सुंदरफलंदाजी प्रदर्शन करीत अर्धशतके झळकावली तर स्रुष्टी वंडलकरने फलंदाजीसह यष्टीरक्षणही सुरेख करीत आपली चमक दाखविली.बुलडाणा 11 संघाकडून उपकर्णधार स्वामिनी पाटील व श्रावणी ईंगळे खामगाव,सुप्रिया पाटील व वैष्नवी शेगाव,राईयाखान व प्रतिक्षा परिहार चिखली,शितल देशमुख सिंदखेडराजा,कांचन काकड,देऊळगावराजा,कर्णधार मानसी पांडे,रुतुजा शिंपी, अनुष्का करतकर मलकापूर,आचल साहु,नागपूर व रिया जैस्वाल मोताळा यांना संधी देण्यात आली.
जिल्हयातील महिला क्रिकेटपटूंची अलीकडील काळातील कामगिरी पाहता त्यांना उज्वल भविष्य क्रिकेटमधे असल्याचे मत राष्ट्रीय खेळाडू निखील भोसले यांनी व्यक्त करीत जास्तीत जास्त संधी खेळाडूंना मलकापूर येथे उपलब्ध करून देवू असे आश्वासित केले,तर स्पर्धेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय खेळाडू निकीता साळुंके हिचे हस्ते संपन्न झाले.तर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ छत्रपती शिवाजी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके यांचे हस्ते संपन्न झाला,यास्पर्धेस जिल्हा समितीचे अध्यक्ष किशोर वाकोडे यांनी भेट देवून महिला खेळाडूंचे कोतुक केले,सामन्यात पंच म्हणून समीर शेख व जय गाढे,ओम गायकवाड तर स्कोरर चेतन सोनोने, नईम खान,आभार स्वप्नील साळुंके यांनी मानले.