Breaking News
recent

१७ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या



    बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी काढलेल्या एका आदेशान्वये जिल्ह्यातील १७ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.यामध्ये मलकापूर शहर पोलिस स्टेशनमधील एपीआय स्मिता म्हसाये यांची बदली नांदुरा तर नांदुऱ्याचे प्रवीण मानकर यांना मुदतवाढ देण्यात आली.. शेगावचे कमलेश खंडारे यांची आर्थिक गुन्हे शाखेत, बिबीचे लहू तावरे मलकापूर शहर, बुलढाण्याचे अभिजीत अहिरराव यांना मुदवाढ, साखरखेड्याचे जितेंद्र आडोळे वाचक शाखेत अर्ज शाखेतील सुनील सोळंके सायबरमध्ये तर खामगाव ग्रामीणचे द्वारकानाथ गोंदके शिवाजीनगर पोलिस स्टेशन, शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे रवींद्र लांडे यांची पोलिस स्टेशन खामगाव ग्रामीण, आर्थिक गुन्हे शाखेतील जायभाये यांची मेहकर पोलिस स्टेशनमध्ये तर नांदुऱ्याच्या वंदना विरणक यांची नियंत्रण कक्षात, सायबरचे दुर्गेश राजपूत बुलढाणा ग्रामीणमध्ये तर बुलढाणा ग्रामीणचे सदानंद सोनकांबळे यांची बिबी येथे. तर डीएसबीचे ब्रिजलालसिंह ठाकूर नियंत्रण कक्ष मलकापूर येथे वाचक शाखेचे नंदकिशोर काळे यांची साखरखेर्डा ठाणेदारपदी तर सविता मोरे पाटील यांची जिल्हा विशेष शाखेत आणि मेहकर पोलिस स्टेशनचे नंदकुमार अहिरे यांची अर्ज शाखेत बदली करण्यात आली आहे

Powered by Blogger.