पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळा थाटामाटात संपन्न
मलकापूर:-आंतरराष्ट्रीय मानांकन ISO 9001-2015 प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य साजरा केला जाणारा ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील जुने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवार, ६ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.०० वाजता या पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजातील सत्य शोधून निष्पक्ष, निर्भिड व सजगपणे जनतेसमोर मांडण्याचा वसा घेऊन पत्रकारीतेच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या वृत्तपत्र संपादकांना व पत्रकारांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिनी राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून मलकापूर नांदुरा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश एकडे, राजेश सुरडकर तहसीलदार मलकापूर, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुरेश रोकडे, हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील, जेष्ठ पत्रकार हरीभाऊ गोसावी, हनुमान जगताप, उल्हासभाई शेगोकार यांची मंचावर उपस्थिती होती.
मा.आ.राजेश एकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आद्य पत्रकार व मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारीतेच्या माध्यमातून कठीण परिस्थितीतही जनप्रभोधन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान दिले याबद्दल उपस्थित पत्रकार बांधवांना माहिती देत येणाऱ्या काळात मलकापूर येथे पत्रकार भवन निर्मितीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रमुख पाहुणे मा.तहसीलदार राजेशजी सुरडकर यांनी आपल्या भाषणात उपस्थित पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत पत्रकार बंधूनी आपल्या लेखणीतून सामाजिक प्रश्न मांडत जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे.देशाला मिळालेल्या स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.तसेच महीलांनीही पत्रकारी श्रेत्रात पुढे यावे त्यासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी पत्रकार बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. सदर कार्यक्रमात राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ गोसावी, ज्येष्ठ पत्रकार हनुमान जगताप, ज्येष्ठ पत्रकार उल्हासभाई शेगोकार यांना प्रदान करण्यात आला. तर राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार सायंदैनिक मलकापूर आजतक चे संपादक वीरसिंहदादा राजपूत, दैनिक मराठा दर्शन चे संपादक नारायण पानसरे, दैनिक करुण भारतचे संपादक गौरव खरे, साप्ताहिक शब्द की गुंज चे संपादक शेख जमील भाई, साप्ताहिक मलकापूर अबतक चे संपादक सय्यद ताहेरभाई, दैनिक पथप्रदीप चे संपादक योगेश हजारे, दैनिक सरळ प्रश्नाचे संपादक अबू बागवान यांना प्रदान करण्यात आला. पत्रकार , बांधवांचा यावेळी सन्मान पत्र व स्मृती चिन्ह देत गौरव करण्यात आला. यावेळी श्रीकृष्ण तायडे, सतीश दांडगे, अजय टप, स्वप्निल आकोटकर विनायक तळेकर, नथुजी हिवराळे, शेख निसार, मनोज पाटील ,धीरज वैष्णव अशोक रावणकार प्रवीण राजपूत राजेश इंगळे कैलास काळे नितीन भुजबळ समाधान सुरवाडे संदीप सावजी देवेंद्र जैस्वाल नितीन पवार प्रमोद हिवराळे दीपक इटणारे धर्मेश राजपूत योगेश सोनोने प्रदीप इंगळे अनिल झंके निखिलची यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार नितीन पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन हिंदी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरे यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.