देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाचे येत्या २३ जानेवारी जयंतीपुर्वी सौंदर्यीकरण व आवश्यक ती कामे करण्यात यावी प्रहारची मागणी
मलकापूर-
देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाचे येत्या २३ जानेवारी जयंतीपुर्वी सौंदर्यीकरण व आवश्यक ती कामे करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज २ जानेवारी रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर शहरामध्ये देशगौरव सुभाषचंद्र बोस यांची अखेरची सभा झालेली आहे. अशा या महान स्वातंत्र्य सेनानी देशगौरव सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक तहसील चौक परिसरामध्ये काही वर्षांपुर्वी उभारण्यात आलेले आहे. मात्र या स्मारकाचे कुठलेही कामकाज अथवा देखभाल दुरूस्तीचे काम झालेले नसल्याने आजरोजी स्मारक हे निर्जीव होत आहे. तेव्हा येत्या २३ जानेवारी रोजी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असल्याने तत्पूर्वी या स्मारकाचे सौंदर्यीकरण व आवश्यक ती कामे करण्यात यावी, अशी मागणी अटय टप यांनी केली आहे.