बुलडाण्यात भगवी लाट, सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा!
बुलढाण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन हिंदू जनआक्रोश मोर्चा; घोषणांनी शहर दणाणले |
बुलढाणा : लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी कायद्याच्या मागणीसह गो-हत्या व महापुरुषांचा अवमान याविरोधात २ जानेवारी रोजी बुलढाण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दुपारी काढण्यात आलेल्या या मोर्चा दरम्यान विविध घोषणांनी शहर दणाणून गेले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता येथील संगम चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चेकऱ्यांनी विविध घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. जयस्तंभ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असता मोर्चात वारकऱ्यांनी सहभाग घेतला.
हा मोर्चा स्टेट बैंक चौकात पोहोचल्यानंतरया मोर्चाचे सभेत जागरप्रमुख अटल पांडे, बजरंग दल यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातून रुपांतर झाले. मोर्चात बजरंग दल सेनेचे प्रांत संयोजक अमोल अंधारे, हिंदू आलेले समाजबांधव सहभागी झाले धनंजय देसाई, आ. संजय गायकवाड, महासभेचे जिल्हाध्यक्ष केशव बेंडवाल, होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. विश्व हिंदू परिषदेचे प्रांतधर्म आर्ट ऑफ लिव्हिंगचे आदित्य पाटील तुम्मोड यांना निवेदन देण्यात आले.
धर्माधिष्ठित राजसत्तेसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे: देसाई
जिहादी, देशद्रोही कारवायांमुळे आपल्या देशाचा सर्वाधिक पैसा हा संरक्षणावर खर्च होतो. तेव्हा हे मोडून काढण्यासाठी धर्माधिष्ठीत राजसत्तेसाठी सर्वांनी एकत्र | येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच धर्माचा प्रचार प्रसार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्षधनंजय देसाई यांनी केले. यासोबतच वर्तमान राजकीय परिस्थितीसह अन्य बाबींचाही त्यांनी उहापोह केला. मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
पालकांनी जागृत राहावे : गायकवाड
विवाह हा एक हिंदू धर्मातील संस्कार आहे. शिव आणि शक्तीचे मिलन आहे. तेव्हा पालकांनी या संस्काराला टिकवून ठेवण्यासाठी आपल्या पाल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, तर गो-हत्या रोखण्यासाठी, गोवंश संरक्षणासाठी शासनाकडे जागा मागितली असून, येत्या काळात या प्रयत्नाला यश येणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले.