सावित्रीबाई मुळेच महिला सन्मानाने जगत आहे- सतीश दांडगे
मलकापूर 4-1-23 सावित्रीमाई मुळेच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सन्मानाने जगत आहे हे फक्त आणि फक्त विद्येची देवता सावित्रीमाई मुळे आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे देऊन सावित्रीमाई फुले यांनी दगड धोंडे खालले तरी देखील महिलांना शिक्षणाचे धडे दिले व आज भारताच्या सर्वोच्च पदावर महिला विराजमान झालेल्या आहे हे फक्त सावित्रीबाई मुळे झाले आहे असे प्रतिपादन भीमनगर येथील अंगणवाडी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलताना पत्रकार सतीश दांडगे यांनी व्यक्त केले आहे.
तर सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा पूनम इंगळे व निशा पैठने मुलींनी साकारली होती. त्यावेळी कविता आजणे, वैशाली इंगळे, सुमन तायडे, वैशाली मोरे, मनीषा मोरे, तथा बाल बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे आयोजन राजकन्या वानखेडे अंगणवाडी शिक्षिका केंद्र .क्रमांक 29 यांनी केले होते.