सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन
महिला मुक्ती च्या जनक स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब तसेच स्त्री शिक्षणाच्या आद्य शिक्षिका व महिला मुक्ती संग्रामाच्या आद्य क्रांतिकारक माता सावित्रीबाई फुले यांच्या गौरवगाथा स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ नांदुरा शहर व तालुक्याच्या वतीने दिनांक ०३.०१.२३ माता सावित्रीबाई फुले जयंती ते १२.०१.२३ राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त महिला जनजागृती अभियान* राबविण्यात येत असून त्याची सुरुवात आज माता सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आज संध्याकाळी ठीक ६.३० मिनिटांनी वार्ड नंबर ०२, येथील श्री संत सावता महाराज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता .
कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या सौ.शित्रे ताई तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ शहराध्यक्षासौ.स्नेहा ताई बेद्रे होत्या तर प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश संघटक विजय डवंगे होते याप्रसंगी सौ.हुरपडे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे जिल्हा संघटक प्रवक्ते श्री दीपक फाळके सर यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस श्री संतोष सातव सरांनी केले तर आभार प्रदर्शन युवा सचिव श्री योगेश डांगे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रेस मीडिया संपर्कप्रमुख देवेंद्र भाऊ जैस्वाल व मोहन भाऊ इंगळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात ओबीसी महिला तसेच बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला.