तो' विचित्र 'तारा' नव्हे तर 'रॉकेट'
मलकापूर
आकाशात गुरूवारी संध्या. ७ चे सुमारास पांढरा शुभ्र लांबलचक दिसणारी बाब म्हणजे विचित्र 'तारा, चांदणी वैगेरे' नव्हती, तर ते 'falcon रॉकेट ९' होते, अशी माहिती हौशी खगोल अभ्यासकाने दिली आहे. संध्याकाळी आकाशात ही बाब दिसताच सोशल मीडियावर फोटो व व्हीडीओ टाकून | लोकांनी एकच चर्चा केली तेव्हा याबाबत हौशी खगोल अभ्यासक संदीप श्रीधनकर, सहाय्यक अभियंता महावितरण यांना व्हीडिओ पाठवून संपर्क केला असता याचा उलगडा झाला. याबाबत अधिकची माहिती अशी, space x ही एक खासगी space company असून त्याचा संस्थापक Elon Musk आहे.
सदर कंपनी जगभरातील ग्रामीण भागा पर्यंत स्वस्त internet सेवा देण्यासाठी starlink नावाची उपग्रह प्रणाली राबवत आहे. आता पर्यंत spaceX ने 207 starlink mission falcon 9 या अद्यायावत प्रक्षेपण याना द्वारे राबवली आहेत. या एकूण 207 mission मध्ये सुमारे 3800 starlink उपग्रह पृथ्वी पासून 600km अंतरावरील कक्षेत प्रस्थापित केले आहेत. दि. ०२ फेब्रुवारी sace x ने भारतीय प्रमानवेळे नुसार दुपारी ३ चे सुमारास अमेरिकेतील जॉन एफ केनेडी प्रक्षेपण स्थळावरून 207 वे falcon 9 या प्रक्षेपण यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले व त्याद्वारे 53 starlink उपग्रह पृथ्वी पासून low earth orbit मध्ये म्हणजेच पृथ्वी • पासून 600 km अंतरावर प्रथापीत केले. आकाशात दिसणारी ही प्रकाशाची रेखा ही falcon 9 रॉकेटची आहे असे त्यांनी म्हटले आहे.