सुसाट चारचाकीने तीन वाहनांना उडवले
मलकापूर: सुसाट चारचाकी वाहनाने एक नव्हे तीन वाहनांना आळीपाळीने धडक देत उडवले. येथील बुलढाणा रस्त्यावर समर्थ किराणा समोर गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यात तीनजण गंभीर असून चारचाकी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.
तालुक्यातील दाताळा येथील रोहन संजय पाटील हा युवक त्याची चारचाकी क्रमांक एमएच २८, बीक्यू ४९९६ या वाहनाने घरी जात होता. बुलडाणा रस्त्यावर त्याचा वाहनावरील ताबा सुटला. या घटनेत सुसाट चारचाकीने दुचाकी, ऑटो रिक्षा व चारचाकी अशा वेगवेगळ्या वाहनांना जबर धडक दिली. त्यात तिन्ही वाहनांतील चालक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी क उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चारचाकी चालकास ताब्यात घेतले.