Breaking News
recent

चार नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली


 मलकापूर प्रतिनिधी

जिल्ह्यातील मलकापूर, मेहकर, चिखली व लोणार या नगर पालिकांमधील मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज, २३ फेब्रुवारी रोजी नगर विकास विभागाने निर्गमित केले. शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांच्या स्वाक्षरीने हे निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश निघाले आहेत. यामध्ये मलकापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांची प्रशासकीय बदली मेहकर नगर पालिकेत करण्यात आली आहे. मलकापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून नांदुरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी आशिष बोबडे यांची बदली झाली आहे. मोताळा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी विभा वराडे यांची लोणार येथे मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

Powered by Blogger.