Breaking News
recent

न्यायालयाच्या आदेशानंतर हे ग्रामपंचायत स्थापनेकडे दुर्लक्ष



हनेगाव 

    स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती बाबत औरंगाबाद न्यायालयाचे आदेश येऊन सुद्धा जिल्हा प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्यामुळे मंगाजीवाडी गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीसाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. देगलूर तालुक्यातील मंगाजीवाडी हे गाव ग्रामपंचायत लोणी अंतर्गत असून हा गाव अनेक समस्यांच्या विखळ्यात सापडला आहे. 

    सदरील गावाला ना पाण्याची सोय ना शिक्षणाची सोय आरोग्याची सोय सुविधा ना बसेसची सुविधा या अत्यंत आवश्यक मूलभूत सुविधा आहेत मात्र या सुविधा या नागरिकांना मिळत नाहीत. यामुळे गावातील नागरिकांना असंतोष निर्माण झाला आहे अनेक वेळा लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी करून सुद्धा दखल कुणीच घेतली नाही जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावे अशी मागणी केली आहे

Powered by Blogger.