पत्रकाराला मारहाण करणारे माफीया यांच्यावर कारवाई करा - रिपब्लिकन सेना
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
पत्रकारांना मारहाण करणारे राशन, वरली आणि गुटखा माफिया यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावे असे निवेदन दि. 25/ फेब्रुवारी 2023 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली ठाणेदार यांना देण्यात आले. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पत्रकार बांधवांवर मारहाण धमकी देणारे काही माफिया यांनी पत्रकार यांना त्यांच्या गाडीने उडवून टाकने अशा प्रकारे अवैध धंदे करणारे माफिया यांना पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही कायदा हातात घेऊन भ्रष्टधिकारी यांचा पाठिंबा घेऊन पत्रकाराला मारहाण करणे धमक्या देणे अगदी सोपे झाले आहे अवैध धंदे खुले आम जिल्ह्यामध्ये करत आहेत. तरी प्रशासन कानाडोळा करतो तसेच दैनिक खोच महाराष्ट्राचे प्रतिनिधी एजाज खान यांच्यावर राशन, वरली, गुटखा माफिया यांनी जीवघेणे हल्ला करून मारहाण केली अवैध धंदे करणारे राशन तस्करी बाबत खोज मास्टर मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते याचा अनुषंगाने साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाले या घटनेचा वाचवा मनात ठेवून अफरोज कुरेशी व त्यांच्या मित्राकडून एजाज खान पत्रकार यांच्यावर जीव घेणे हल्ले केला तसेच हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिली .
बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध धंदे खुलेआम प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे ते जनतेसमोर पत्रकार बांधव छापत आहे पत्रकार बांधव यांना धमक्या देण्याचं काम राशन ,वरली आणि गुटखा माफिया करत आहे अवैध धंदे करणारे माफिया यांना प्रशासनाचा धाक मुळातच नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून अवैध धंदे करणारे यांचे ताकद खुले आम वाढली आहे या राशन , वरली आणि गुटखा माफियांवर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी दिला निवेदन देतेवेळी जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, तालुकाध्यक्ष श्याम लहाने, शहराध्यक्ष सुनील सोळंके, तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, तालुका सदस्य अरुण जाधव, यश बावस्कर इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.