Breaking News
recent

अंभोऱ्याचे ग्राम दैवत नवसाला पावणाऱ्या अंबेश्वराची 25 व 26 मार्च रोजी यात्रा

अंबेश्वर यात्रेनिमित्त कुस्त्यांची जंगी दंगल


संतोष आमले  पनवेल प्रतिनिधी 

    आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील पुरातन हेमाडपंथी अंबेश्वर महादेवाचे मंदिर या ग्राम देवताची यात्रा 25 व  26 मार्च रोजी भरणार असूनयात्रेनिमित्त 26 मार्च  ला कुस्त्यांची दंगल आयोजित केल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. अंभोरा येथे अंबेश्वराचे प्रसिद्ध देवस्थान असून याठिकाणी भरणारी यात्रा व होणारा कुस्त्यांचा हंगामा पंचक्रोशीमध्ये प्रसिध्द आहे. 26 मार्च रोजी अंबेश्वराची यात्रा भरणार असून या दिवशी परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या वतीने या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असुन गावातील नवतरुण पैठण याठिकाणी जाऊन देवाला वाहण्यासाठी पायी कावडीने पाणी आणतात कावडीने पाणी यात्रेच्या दिवशी सकाळी ८ वाजता देवाला मोठ्या मिरवणुकित गाजत वाजत घातले जाते. कावडीचे पाणी देवाला पडल्यानंतर वर्षभर देवाला बोललेले नवस पेडे गुळ वाटुन फेडले जातात. संध्याकाळी उशिरापर्यंत नवसाचे पेढे देवाला वाहून सगळ्यांना वाटले जातात. त्यानंतर रात्री छबिन्यामध्ये देवाच्या काठीची मिरवणूक निघते.

 देवाच्या काठ्यांची मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने गावभर करतात . पहाटेच्या सुमारास फटाक्यांची आतिषबाजी पाहण्याजोगे असते यात्रेचा दुसरा दिवस याचे फार मोठं आकर्षण असते. यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रम होतो . परिसरामध्ये विविध लोककलावंत याठिकाणी हजेरी देण्यासाठी येत असतात व त्यांनी आपली लोककला सादर केल्यानंतर मोठ्या खुशीने गावकरी त्यांना बिदागी देतात या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे अंभोरा येथील असणारी प्रसिध्द निकाली कुस्त्यांची दंगल अहमदनगर, बीड ,पाथर्डी ,पुणे अशा दुरदुरून नामवंत पहिलवान या कुस्त्यांच्या दंगलींसाठी आपली हजेरी लावतात. अशाप्रकारे 25 व 26 मार्च  रोजी चालणाऱ्या यात्रा उत्सवासाठी मंदीरामध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे नवसाला पावनारा अंबेश्वर या परिसरमध्ये प्रसिद्ध आहे. प्रशस्त असे महादेवाचे मंदिर अंभोरा या ठिकानी आहे. यात्रेची सर्व तयारी झाली असुन भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Powered by Blogger.