Breaking News
recent

आमदार चषकासाठी उद्या होणार ' महामुकाबला

 


पुणे, नाशिक कोल्हापूरसह एमपी, युपी, गुजरात आणि गोव्यातल्या खेळाडूंनीही नोंदवला सहभाग. युट्यूबवर स्पर्धेच्या प्रेक्षकांचा आकडा गेला  १ लाखापार


प्रतिनिधी/भरत जोगदंडे

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवराजदादा पाटील मित्र मंडळाच्या वतीने आमदार चषक - २०२३  भव्य डे - नाईट टेनिस बाँल क्रिकेट सामन्यांची महाअंतिम लढत उद्या दि. २६ मार्चला  रंगणार आहे. या स्पर्धेत  गेल्या चार दिवसात झालेल्या सामन्यामधून राज्यातील पुणे, नाशिक कोल्हापूरसह एमपी, युपी, गुजरात आणि गोव्यातल्या खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाचा आनंद चिखलीकरांनी लुटला असून युट्यूबवर ' टेनिस बाँल डाँट इन या चँनलवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या १ लाखापेक्षा अधिक आहे. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघासह उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.


गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात  उद्घाटन झालेल्या या स्पर्धेत एकहून एक सरस संघ सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे  या संघांमधील रंगतदार सामन्यांना प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात आयोजित या भव्य स्पर्धेत ' ए ', ' बी ', ' सी ' आणि ' डी ' गटात प्रत्येकी चार असे एकूण १६ मातब्बर  संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये स्थानिक व जिल्ह्याबाहेरील संघाचा देखील समावेश आहे. सहभागी संघातील नामवंत खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत असून त्यांच्या कामगिरीचा मनमुराद  आनंद क्रिकेट रसिक लुटत आहेत.

*तीन दिवसात अश्या झाल्या लढती*

 पहिल्या दिवशी  पहिला सामना 

आकाशदादा ११ ( खामगांव ) आणि  मकासरे किंग ( भुसावळ ) यांच्यात झाला. यामध्ये आकाशदादा ११ संघ  विजेता ठरला. दुसऱ्या सामन्यात  शिवराना चांडोळ  हा संघ  विजता ठरला. यांनी बुलढाणा ११ चा पराभव केला.  शिवराना चांडोळ आणि आकाशदादा १! यांच्यात झालेल्या तिसऱ्या  सामन्यात  शिवराना चांडोळ संघाची सरशी झाली.  दुसऱ्या दिवशी दि. २३ मार्चला श्री नीलकमल विरुद्ध  निलेश गावंडे ११ यांच्यात रंगलेल्या सामन्यात  निलेश गावंडे ११ ने बाजी मारली तर भीमस्टार बुलढाणा आणि  राफे ११ चिखली यांच्यातील लढतीमध्ये राफे ११ संघ  विजेता ठरला. राफे ११ व निलेश गावंडे ११ यांच्यातल्या सामन्याचा निकाल  

निलेश गावंडे ११  संघाच्या बाजूने लागला. तिसऱ्या दिवशी साँनिक अमरावती आणि समर्थ ११ बुलढाणा  यांच्यात पार पडलेल्या सामन्यात साँनिक अमरावती विजयी झाला तर जेएमडी युनीक ११ व तुषारअण्णा बोंद्रे ११ यांच्यात झालेल्या लढतीमध्ये जेएमडी युनीक ११ ने बाजी मारत उपांत्यपूर्व फेरी गाठली. चौथ्या दिवशी म्हणजे आज  दि. २५ मार्च रोजी गब्बर ११ ( अकोला ) विरुद्ध रूद्र ११ आणि  साईबाबा ११ विरुद्ध बार्शी  ११ यांच्यात लढत होणार असून यातील विजेत्या संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी देखील कडवी झूंज होईल.

*स्टार खेळाडूंचा सहभाग आणि युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण*

           विदर्भातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेल्या या दिवस - रात्र टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक मातब्बर क्रिकेट संघांनी भाग घेतला आहे. या संघांमध्ये अनेक अनुभवी व नामवंत खेळाडू सहभागी झाले आहेत. या पैकी अनेक जण तडाखेबाज फलंदाजी करणारे, भेदक गोलंदाजी करणारे व अचूक क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षण करणारे आहेत.  विशेष म्हणजे या संघामध्ये राज्यातील पुणे, नाशिक, बारामती, सोलापूर आणि नगर व कोल्हापूरसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि गोव्यातल्या स्टार  खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाचा आनंद चिखलीकर क्रिकेट रसिक  लुटत आहेत. याशिवाय  युट्यूबवर ' टेनिस बाँल डाँट इन या चँनलवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या १ लाखापेक्षा अधिक आहे. उद्या होणाऱ्या दोन उपांत्य आणि एका अंतिम सामन्याला लाईव्ह  पाहणाऱ्या प्रेक्षकांची सुध्दा यामध्ये भर पडणार आहे. 

*आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण*

पाच दिवस चालणाऱ्या या भव्य स्पर्धेचा समारोप दि. २६  मार्च रोजी आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या बक्षीस वितरणाने  होईल.  विजेत्या व उपविजेत्या संघासह मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज व.उत्कृष्ट गोलंदाज ठरणार्या खेळाडूंचा  मान्यवरांच्या उपस्थितीत आ. श्वेताताई महाले स्वतः गौरव  करणार आहेत.

Powered by Blogger.