सैलानी बाबांच्या दर्ग्यावर चढवली भाविकांनी चादर
पिंपळगाव सराई नारळाच्या होळीनंतर प्रारंभ झालेल्या सैलानी बाबांच्या यात्रेचा समारोप १२ मार्च रोजी दर्गाहवर चादर चढवून करण्यात आला या यात्रा महोत्सवाचा समारोप येत्या १६ मार्च रोजी होणार आहे दरम्यान, काही भाविकांनी संदल नंतर परतीची वाट धरली आहे पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबांच्या यात्रा महोत्सवात देशभरातील हजारो भाविक सहभागी झाले होते.
६ मार्च रोजी नारळांची होळी केल्यानंतर या यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला होता १२ मार्च रोजी रात्री आठ वाजता सैलानी बाबांचा संदल काढण्यात आला पिंपळगाव सराई येथील संदल घरातून सजविलेल्या सांडणीवरून सैलानी बाबाची शाही मिरवणूक निघाली होती. रात्री १० ३० ते ११ च्या दरम्यान मुजावरांच्या हस्ते सैलानी बाबांच्या दर्यावर चादर चढवून संदल लावण्यात आला. संदल होताच गत काही दिवसांपासून राहुट्या करून राहत असलेल्या भाविकांनी परतीची वाट धरली आहे
ढोल-ताशांचा गजरात मिरवणूक
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांचा संदल ढोल- ताशांच्या गजरात काढण्यात आला सैलानी बाबांचा हा एकशे सोळावा संदल होता हजारो भाविकांच्या उपस्थितीत रात्री अकरा वाजता शेख रफिक मुजावर, शेख शफिक मुजावर, शेख चांद मुजावर, जाहीर मुजावर, रशीद मुजावर, राजू मुजावर, नईम मुजावर यांच्या हस्ते सैलानी बाबाच्या समाधीवर चादर चढविण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला