सर्पमैत्रिण प्रतिभा ठाकरे मातृशक्ती पुरस्काराने सन्मानित
अकोला:-जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला असून हा कार्यक्रम अकोला येथे दिनांक ११ मार्च २०२३ ला घेण्यात आला.हा कार्यक्रम युवक काँग्रेस यांचा द्वारे आयोजित केल्या जात असून समाजातील कर्तबगार समाजासाठी अविरत सेवा करणाऱ्या माता भगिनींना हा पुरस्कार देण्यात येतो युवक काँग्रेस द्वारा हा कार्यक्रम गेली पाच वर्षांपासून ते राबवित असून यावेडेस त्यांनी हा पुरस्कार पारस चा सर्पमैत्रिण प्रतिभा ठाकरे यांचा कार्याची दखल घेत त्यांना प्रधान केला असून
हा पुरस्कार विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांना देण्यात आला हा कार्यक्रम राजे संभाजी पार्क अकोला जवाहर नगर अकोला येथे घेण्यात आला असून या कार्यक्रमाचे आयोजन सागर दादा कावरे सचिव महाराष्ट्र प्रदेश यांनी केलं असून गेली पाच वर्षांपासून हे जागतिक महिला दिनाच अवचित्य साधून समाजात समाजासाठी कार्य करणार्या महिलांचा सत्कार ते करीत असतात
या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून मराठी सिने अभिनेत्री तथा दिग्दर्शक मा .किशोरी ताई शहाणे यांचा हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.प्रमुख उपस्थिती मध्ये मा.धीरजभाऊ लिंगाडे (आमदार- अमरावती मतदार पदवीधर मतदार संघ) शिवराज मोरे उपाध्यक्ष महा. प्रदेश यु काँग्रेस मा. शिवानी ताई वडेट्टीवार महा.सचीव प्रदेश यु.काँग्रेस तसेच आयोजका मध्ये अंशुमन देशमुख, पंकज देशमुख, प्रवीण काळे,भूषण चतरकर,संजय ढोरे,अंकुश भेंडेकर,धीरज देशमुख,रोहन पाटील,तुषार गावंडे, वैभव इंगळे,प्रदीप मोहोड,नितीन काळमेघ,राहुल कावरे यांनी मौल्यवान सहकार्य केले