मुखेड तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई मिळावी
मुखेड तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानीचे तात्काळ पंचनामे व्हावेत शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवासी तहसीलदार महेश जी हांडे साहेबांची भेट घेऊन शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने रब्बी पिकांचे,फळबागाचे तात्काळ पंचनामे करुन मदत द्यावी.व पिकविम्याचा लाभ देण्याची व पिकविम्याचे पंचनामे आज पासुन चालु झाले तरी शेतकर्यांना विमा कंपनीच्या कर्मचार्याकडुन वेठीस धरण्यात येवु नये अशी मागणी शेतकरी पुत्र संर्घष समीती नांदेड बालाजी पाटील ढोसणे बालाजी पाटील सांगवीकर यांनी निवेदनाद्वारे केली.