Breaking News
recent

अंभोरा येथे हाडांची मोफत तपासणी व उपचार शिबिर संपन्न

 
                               कै. सौ.हौसाबाई थोरात यांच्या स्मरणार्थ हाडांचे मोफत तपासणी व उपचार शिबिर संपन्न


पनवेल प्रतिनिधी 

    तालुक्यातील अंभोरा येथे हाडांची मोफत तपासणी व शिबीर रविवारी संपन्न झाले यामध्ये गावातील व परिसरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला याबाबत सविस्तर माहिती अशी की कै.सौ. हौसाबाई मोहनराव थोरात यांच्या स्मरणार्थ डॉक्टर रवींद्र रामेश्वर थोरात अस्थिरोग तज्ञ औरंगाबाद यांच्या वतीने अंभोरा गावातील व परिसरातील हाडासंबंधी आजारी असणाऱ्या व्यक्तींसाठी मोफत तपासणी व मोफत उपचार करण्यात आले. या या शिबिराचा अंभोरा परिसरातील 200 रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये डॉ. रवींद्र थोरात यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत गोळ्या व सलाईन दिले. आजीच्या स्मरणार्थ डॉ. रवींद्र थोरात यांनी हे शिबिर ठेवण्यात आले होते.

डॉक्टर रवींद्र रामेश्वर थोरात हे अस्थिरोग तज्ञ असून औरंगाबाद या ठिकाणी सध्या ते प्रॅक्टिस करीत आहेत. आपल्या जन्मभूमीतील रुग्णांची सेवा आपल्या हातून घडावी व आपल्या गावातील व परिसरातील रुग्णांना त्याचा फायदा व्हावा हा उद्देश मनाशी धरून त्यांच्या आजी कै. सौ हौसाबाई मोहनराव थोरात यांच्या स्मरणार्थ त्यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी औरंगाबादहून त्यांची सहकारी टीम सुद्धा बोलवण्यात आली होती. अंभोरा येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपायुक्त रामेश्वर थोरात यांचे ते चिरंजीव आहेत. अंभोरा ग्रामपंचायतच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले. अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन करून रुग्णांची सेवा केल्याबद्दल अंभोरा गावचे सरपंच सागर आमले यांनी डॉक्टर रवींद्र थोरात यांचे आभार मानले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच सागर आमले उपसरपंच रोहित खाकाळ माजी पंचायत समिती सदस्य सुभाष  खाकाळ. पांडुरंग थोरात ज्ञानेश्वर खाकाळ सर ग्रामपंचायत सदस्य सचिन आमले सोनाजी आमले विश्वास खाकाळ संतोष आमले भुवनेश्वर गवळी समीर सय्यद राजेश आटोळे इतर ग्रामस्थ उपस्थित होते

Powered by Blogger.