Breaking News
recent

सशस्त्र हाणामारी प्रकरणातील जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू

  


मलकापूर येथील ताजनगरातील सशस्त्र हाणामारी प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी वरून तब्बल २० जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर आज दुपारी अकोला येथे उपचारादरम्यान मो. शरीफ मो. रज्जाक (वय २५) याचा मृत्यू झाला आहे. दोन्ही गटातील १३ जणांना अटक करून गजाआड करण्यात आले आहे. चाकूच्या हल्ल्यात गंभीर दुसऱ्याचीही प्रकृती अत्यवस्थ आहे.


विजेच्या खांबावरून पारपेठ प्रभागातील ताजनगरात बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शेजारी-शेजारी वास्तव्य करणाऱ्या दोन गटात वाद उफाळून आला होता. नंतर शाब्दिक चकमक झाली त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. एका गटाच्या वतीने दुसऱ्या गटातील लोकांवर चाकूने हल्ला चढवला त्यात पाच जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी राजमोहम्मद अ. रशिद रा. ताजनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी शाहरुख खान मुनिरखान, जावेदखान मुनिरखान, मुनिरखान नूरखान, हमीदखान मेहमूदखान, अक्रमखान कलीमखान असलमखान अशा मुनिरखान, सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चौघांना अटक करून गजाआड करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके करीत आहेत.

विरोधी गटाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अ. रज्जाक अ. समद, अ. साबीर अ. रज्जाक, राजमोहम्मद अ. रशिद, अ. कलीम अ. समद, अ.युसूफ अ. रशिद, अ. हनिफ अ.हजीज, शे. मोबीन शे. नबू, अ. आसीफ अ. रज्जाक, अ. अलीम अ. कलीम व इतर ५ अशा १४ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एकूण ९  जणांना अटक करुन पोलिसांनी गजाआड केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नरेंद्रसिंह ठाकूर करीत आहेत.

दरम्यान बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पारपेठ प्रभागात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही गटातील लोकांना सशस्त्र हाणामारीत जखमा झाल्याच उघडकीस आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर ढवळून निघाला आहे. शेजारी शेजारी असलेल्या दोन गटात वाद उफाळून आल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी जातीने या प्रकरणी लक्ष घालून आहे गुन्हयात कलम ३०२ ची वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Powered by Blogger.