सरपंच सागर आमले यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर रविवारी पुरस्कार प्रदान सोहळा
संतोष आमले पनवेल प्रतिनिधी
तालुक्यातील अंभोरा येथील सरपंच सागर आमले यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहमदनगर या ठिकाणी संपन्न होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आष्टी तालुक्यातील अंभोरा ग्रामपंचायतचे युवा सरपंच सागर आमले यांनी गावांमध्ये कमी कालावधी लोकसहभाग वैयक्तिक आणि विविध योजनेतून गावाचा विकास साधला आहे.गावातील विकासाच्या कामांची नोंद सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी घेतली आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये निवडून आल्यानंतर गावांमध्ये बाजार सुरू केला. या आठवडी बाजारामध्ये जनावरांचा बाजार सुरू केल्याने गावातील शेतकऱ्यांची गैरसोय टळली. गावामध्ये अत्यंत अल्प दरामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी दवाखाना सुरू केला. यादवखान्यामध्ये फक्त गोळ्या औषधाचे पैसे घेतले जातात इंजेक्शन व इतर सुविधा मोफत आहेत. यामुळे गावातील वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आजारी पडल्यानंतर इतर गावांमध्ये उपचारासाठी जाण्यासाठी जो त्रास होत होता तो कमी झाला. शासनाची पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्यामुळे घरोघरी नळ कनेक्शन देऊन लोकांना पाण्याची सोय केली. गावामध्ये कॅनपॅक्स केमिकल कंपनीच्या सहकार्याने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू केली.
अंभोरा या गावाची लोकसंख्या २५०० आहे तसेच गावाचे क्षेत्रफळ १७५० हेक्टर आहे. या गावात चार रस्त्यांचे काम लोकसहभागातून करण्यात आले. सरपंच सागर आमले यांनी वैयक्तिक खर्चातून जेसीबी मशीन मध्ये डिझेल टाकले. विहिरीवरचे निघालेले ड्ब्बर/खडी व मुरूम काढून ९ किलोमीटर चे रस्ते निर्माण केले. या रस्त्यांसाठी मिशन ५०० व EWT MSCDA दादर मुंबई यांच्या सहकार्य लाभले.
या अंतर्गत खालील चार रस्त्यांचे कामे करून घेण्यात आली
१) अंभोरा ते सालेवडगाव रस्ता
२) कर्डिले वस्ती रस्ता
३) गणपती मंदिर ते खकाळटका रस्ता
४) कारखाना रोड ते मायंबा रस्ता
या कामातून परिसरातील साधारण १०० कुटुंबांना फायदा झाला. या योजनेअंतर्गतच नुकतेच नाला रुंदीकरण खोलीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. अशा एक अनेक योजना गावांमध्ये राबवून गावाचे एका आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे. अशा या गावाचे सरपंच सागर आमले यांच्या कार्याची नोंद घेऊन सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून निवड केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.