Breaking News
recent

क्षुल्लक कारणावरून १७ वर्षीय तरुणाच्या पोटात चाकू मारला:उपचारादरम्यान मृत्यू


मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगर येथे राहणारा पीडित अल्पवयीन मुलगा हा आपल्या मित्रांसह क्रिकेट खेळत होता. यावेळी दुसरा | एक अल्पवयीन मुलगा तेथे आला आणि त्याने त्याची बॅट तोडली. यावरून दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर आरोपी मुलाने तोडलेल्या बॅटचे पैसे देखील पीडिताला दिले. मात्र दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचा राग मनात धरून अल्पवयीन आरोपीने मृतक यश कैलास चव्हाण याच्या पोटात चाकूच खुपसला. मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगर मधील दोन तरुणांमध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून यश कैलास चव्हाण या १७ वर्षीय तरुणाच्या पोटात अल्पवयीन मुलाने चाकू मारल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली होती. ज्यामध्ये यश कैलास चव्हाण गंभीर जखमी झाल्याने त्याला मलकापूर वरून बुलडाणा येथील खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र त्याचा पहाटेच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला त्याचा मृतदेह शव विच्छेदन गृहात आणण्यात आला असून, वृत्त लिहे पर्यंत पोलिसात तक्रार दाखल प्रक्रिया सुरू होती.

Powered by Blogger.